जिल्हा प्रशासनातर्फे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यातील कलावंतानांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीस महाराष्ट्राची हास्यजत्रा, २९ रोजी डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित आयुष्यावर बोलू काही, १ मार्चला सन्मीता धापटे-शिंदे, चैतन्य कुलकर्णी प्रस्तुत ‘सुरसंस्कृती’, २ मार्चला महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा ‘गर्जा सुवर्ण महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

३ मार्च रोजी मुंबई साहित्य संघ निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा विभागीय सरस महोत्सव देखिल होणार आहे. या महोत्सवात २५० स्टॉल सहभागी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे हरीश भोई, यावल वनविभागाचे जमील शेख, अमित माळी उपस्थित होते.

Protected Content