महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड – चंद्रकांत पाटील

मुंबई – महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले होते. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली होती. यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यांसदर्भात विचारले असता, हे काय नवीन? असं म्हणत टोला लगावला. 

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!