खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शंभर वर्षापेक्षा जास्त लाकडी गणपतीच्या मिरवणुकीची परंपरा.. मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात होतो स्थापन.. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख..
हा सर्वत्र गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन होत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यातील रजत नगरी खामगाव येथे गणपती मंडळाची स्थापना केली जाते .आणि तिथली मिरवणूक पाहण्याकरता संपूर्ण जिल्ह्यातून लोक येत असतात.
आज सकाळी नऊ वाजता मानाच्या लाकडी गणपती ची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्या पाठोपाठ गावातील पाच मानाच्या गणपती नंतर इतर गणपती या मिरवणुकीत सहभाग झाला आहे. मुख्य म्हणजे या मिरवणुकीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीमी श्वान ने सर्वांना आकर्षित करून घेत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण संवेदनशील मस्तान चौक परिसरामध्ये गणपती मार्गस्थ होत असतात .तिथे जिमी कसून तपासणी करत आहे. बॉम्ब शोधक पथक संपूर्ण गणपती मार्गावर लक्ष ठेवून आहे. या बॉम्बशोधक पथकाचे पोलीस निरीक्षक मोबीन शेख यांच्याशी आम्ही थेट बातचीत करून आढावा घेतला आहे.