जळगावात रिक्षाचालकाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलसमोरून रिक्षा चालकाच्या हातातीत मोबाईल अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जितेंद्र नामदेव आंबेकर (वय-५१) रा. शाहू नगर, जळगाव हे रिक्षाचालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलसमोर रिक्षा थांबावून मोबाईलवर बोलत होते. त्याचवेळी अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांच्या हातातील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी शनिवार १८ डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.

Protected Content