जळगाव प्रतिनिधी । शहरातील काँग्रेस भवनासमोरील जैन मंदीरासमोर रिक्षाचालकाने दिलेली स्टेपनी परत मागितल्याच्या रागातून रिक्षाचालकाला दोघांकडून शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गजानन भिका राऊत (वय-३७) रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा हे कुटुंबियासह राहतात. रिक्षाचालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या ओळखीचे रिक्षाचालक अमोल पाटील यांनी स्टेपनी मागतली होती. काम आटोपल्यानंतर दिलेली स्टेपनी परत मागितले. अमोल पाटील याचा राग असल्याने गजानन राऊत याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. अमोल सोब किरण भावसार याने हातातील लोखंडी कड्याने मारहाण करून धमकी दिली. यात ते गंभीर जखमी झाले. रिक्षाचालक गजानन राऊत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय बडगुजर करीत आहे.