पाळधी गावातून ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी; गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी गावातून ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी केल्याची घटना रविवारी ५ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बापू कोळी यांच्या आटो गॅरेज समोर ट्रॅक्टर क्रमांक (एम
एच २० एवाय ७०२७) आणि विना क्रमांकाचे ट्रॉली पार्किंगला लावली होती. दरम्यान शनिवारी ४ मे रोजी रात्री १० ते रविवारी ५ मे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी केल्याचे उघडकीला आले. या संदर्भात ट्रॅक्टर मालक अनिल शालिक सपकाळे वय-३५, रा. कोळीवाडा पाळधी ता. धरणगाव यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची कुठलीही माहिती मिळाली नाही, अखेर दुपारी ३ वाजता त्यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content