जळगाव प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने गावात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जिल्हापेठ हद्दीतील मानियार होलसेल दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, विजय नवल अहिरे (वय-३१) रा. वाघ नगर हे पोलीस कर्मचारी आहे. बुधवार ४ मे रोजी ११ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जिल्हापेठ हद्दीतील मणियार होलसेल दुकानाजवळ दुचाकीने आले. दुकानासमोर (एमएच १९ सीकी ४०४५) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावून ते कामानिमित्त निघून गेले. १५ मिनिटानंतर काम आटोपून ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. पोलीस कॉन्स्टेबल विजय अहिरे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.