जळगाव जिल्ह्यात आज नवीन 810 जणांना कोवीशिल्डची घेतली लस

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 21 लसीकरण केंद्रावर आज जिल्हाभरात एकुण  810 जणांना पहिली लस तर 578 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 20 हजार 231 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून आला आहे. आज जिल्ह्यातून 316 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५  वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे.  दरम्यान जिल्ह्यातील 21 कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा रूग्णालय- 36, गोल्ड सीटी हॉस्पिटल-53, गाजरे हॉस्पिटल-44, ऑर्किड हॉस्पिटल-24 , जैन हॉस्पिटल-0, जामनेर-48, चोपडा-33, मुक्ताईनगर-18, चाळीसगाव-54, पारोळा-56, भुसावळ-41, अमळनेर-40, पाचोरा-89, रावेर-32, यावल-71, भडगाव-9, बोदवड-8, एरंडोल-57, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-13, धरणगाव-80, एम.डी. भुसावळ-4 असे एकुण 810 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज  578 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content