विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हॉटेल सुमेरसिंग येथील ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा विजेच्या धक्का लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुकेश उर्फ विलास शालीग्राम भुसारी (वय-४२) रा. भवानी नगर, नशिराबाद ता.जि.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश भुसारी हा आपल्या परिवारासह नशिराबाद येथे वास्तव्याला होता. गावातील हॉटेल सुमेरसिंग येथे नोकरीला होता. गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी मुकेश भुसारी हा कामावर असतांना त्यांला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यांला सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content