जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्याचा ९५.७२ टक्के निकाल लागला असून यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे.
उत्तर महाराष्ट्रात निकालात नाशिकनंतर जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्यातील ५७ हजार ८८ विद्यार्थ्यापैकी ५४ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर २४ हजार ७८९ परिक्षार्थी मुलींपैकी २३ हजार ९७२ मुली पास झाल्या आहे. त्यामुळे यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींच अव्वल ठरल्या आहेत.
यंदा सुधारीत मुल्यमापन कार्यपध्दती नुसार परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील २७ हजार २४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी १९ हजार १८८ असून व्दितीय श्रेणीत ७ हजार २५३, तर पास श्रेणी मध्ये ९६४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.