धानवड येथे शेतकर्‍याचे भरदिवसा घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथे शेतकऱ्याचे बंद घर फोडून रोकडसह ४५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना  समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धानवड येथे कैलास नारायण पाटील वय ३९ हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. शेती करुन ते उदरनिर्वाह भागवितात. मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कैलास पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांना सोबत घेवून नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दोन दरवाजांचे असलेले घराचा समोरील दरवाजा बाहेरुन कुलूप तर मागील दरवाजाला आतून कडी लावली होती. यादरम्यान चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरातील वेगवेगळया डब्यात ठेवलेली ३५ हजार रुपयांची तसेच ५ हजारांची रोकड, ८ हजार रुपयांचे हातातील कडे, व २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ४५ हजारांचा ऐवज लांबविला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कैलास पाटील हे घरी परतले असता, चोरीचा प्रकार उघड झाला. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी हे करीत आहेत.

 

Protected Content