चाळीसगावात एकाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव प्रतिनिधी । घराच्या कंपाऊंड बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी संधी साधून लंपास केल्याची घटना शहरातील हिरापूर रोडच्या परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, भगवान आबासाहेब पाटील (वय-३१ रा‌. सुरेश लॉन्स शेजारी, हिरापूर रोड ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून रिलायन्स जिओ इन्फोकम लि. कंपनीत कामाला आहे. दरम्यान भगवान हा ५ जुलै रोजी रात्री ८ वाजता वैयक्तिक कामानिमित्त टाकळी प्र.चा. येथे गेला होता. काम आटोपल्यानंतर तो रात्री १० वाजताच्या सुमारास घरी परतला. तत्पूर्वी त्यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. १९ डी.एल- ६८२०) घराच्या कंपाऊंड बाहेर पार्क केली व झोपण्यासाठी निघून गेला. सकाळी उठल्यावर भगवान हा कामावर जाण्यासाठी  मुळ जागी दुचाकी पाहाली असता. त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली परंतु मिळून न आल्याने ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास विजय महादू शिंदे हे करीत आहेत.

Protected Content