आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ तक्रार दाखल करा – पिंगळे

रावेर प्रतिनिधी । कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. 

रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी  येऊन संबधित शेतकरऱ्‍यांचा विश्वास संपादन करून केळीच्या पिकाची कापनी करतात व संबधित शेतकऱ्‍यांना चेक देतात. परंतु शेतकरी जेव्हा चेक व्हीड्रोल करायला जातो, तेव्हा तो चेक बाउंस होतो. यामुळे शेतकऱ्‍याची आर्थिक फसवणुक होते. ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी यावल पोलिस स्टेशन गुन्हा देखील झाला आहे. अशी फसवून इतर शेतकऱ्‍यांची होऊ नये तसेच झाली असल्यास संबधित पोलिस स्टेशनला व्यापाऱ्‍ विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आवाहन फैजपुर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे.

Protected Content