रावेर नगरपालिकेतर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेचा शुभारंभ

रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेतर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्वपूर्ण योजनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे शहरातील प्रत्येक घरातील सदस्याची तपासणी करायला सुरुवात झाली असून या तपासणी मोहीमला जनतेतुन देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना व्हायरसचे पेशंट तपासणी साठी रावेर पालिकेने आता प्रत्येक घरातील कुटुंबा असलेल्या सदस्याची तपासणी करायला सुरुवात केली आहे.पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन इन्फारेड थर्मामीटर तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी करत आहे.कोणाला कोरोना व्हायरसचे लक्षणे जानवल्यास त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे.

पालिकेतर्फे तपासणीसाठी दहा पथके तयार
रावेर पालिके कडून माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेवर शहरात तपासणी करण्यासाठी पालिकेने दहा पथके तयार केली आहे.या प्रत्येक पथकामध्ये एक सफाई कर्मचारी तर एक पालिका कर्मचारी असून असे एकूण दहा पथके आहे हे शहरातील प्रत्येकाच्या घरी जाऊन इन्फारेड थर्मामीटर तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने नागरीकांची तपासणी करणार आहे.

शहरतील प्रत्येक कुटुंबाची होणार तपासणी
कोरोना व्हायरसचे पेशंट तपासणी साठी माझ कुटुंब माझी जबाबदारी या तपासणी मोहीमेचा पहीला टप्पा दि १५ सप्टेंबर ते दि १० ऑक्टोबर दरम्यान असेल तसेच दूसरा टप्पा १४ ते २४ ऑक्टोबर दरम्यान असेल यामुळे कोरोना व्हायरस मुळा सकट उपडुन फेकण्यासाठी पालिकेच्या लांडे प्रशासनाने कंबर कसली आहे.

गरज असल्यास तरच शहरात या- सिईओ
रावेर शहरात कोरोना व्हायसर बराच आटोक्यात आला असून रावेर शहराला लागून असलेल्या गावांच्या नागरीकांना माझे अवाहन आहे.की गरज असल्यास तरच रावेर शहरात यावे येत्यांना तोंडाला माक्स व सोशल डीस्टंसीन ठेवावे कोणाला कोरोना’चे लक्षणे जानवल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे अवाहन रावेर नगर पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.

Protected Content