भुसावळात शिक्षकाचे बंद घर फोडून दागिने लांबविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोपाळ नगरात एका शिक्षकाचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ६० हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटनासमोर आली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र अशोक कोल्हे (वय-४६) रा. गोपाळ नगर, भुसावळ हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे, ते शिक्षक असून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि सोन्याचे तार असा ऐकून ६० हजार ९०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला सायंकाळी ६ वाजता  राजेंद्र कोल्हे घरी आले असता त्यांना हा प्रकार उघडकीला आला. तातडीने त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहे.

Protected Content