विद्यापीठात संशोधन आराखडा लेखन कार्यशाळा उत्साहात 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र प्रशाळेत दोन दिवसीय संशोधन आराखडा लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर येथील सेवानिवृत्त शिक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. मा. डॉ. इंदुमती भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

१३ व १४ जुलै रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा इंदाणी या होत्या. पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थांमध्ये संशोधन विषयाची अभिरुची वाढावी तसेच योग्य संशोधन अभिवृत्ती विकसित व्हावी व भविष्यात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व समाजास उपयुक्त अशी संशोधने हाती घ्यावी म्हणून शिक्षणशास्त्र प्रशाळेत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शिक्षणशास्त्र प्रशाळेतील तसेच पीएच. डी. अभ्यासक्रमास प्रवेशित एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. या कार्यशाळेत डॉ. इंदुमती भारंबे, डॉ. मनीषा इंदाणी, डॉ. मनीषा जगताप व प्रा. समाधान कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेह सोनार यांनी केले तर आभार सविता अहिरराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशाळेतील डॉ. संतोष खिराडे, प्रा. डॉ. रणजीत पारधे प्रा. समाधान कुंभार व जयश्री पाटील (संशोधक विद्यार्थी) तसेच विद्यार्थी मयूर पाटील, कैलास ठाकरे, व इलिझा पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी जयेश पाटील व विष्णु कोळी यांनी परिश्रम घेतले.

रांगोळी व वकृत्व स्पर्धा : गुरुपोर्णिमे निमित्त शिक्षणशास्त्र प्रशाळेत झालेल्या वकृत्व स्पर्धेत मोनिका सोळंके हिने प्रथम तर दिनेश बारेलाने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. रांगोळी स्पर्धेत रूपाली पाटील प्रथम तर स्वप्नील पाटील द्वितीय आला.

Protected Content