भडगावात ‘कोरोनाकडून कॉलेजकडे’ ऑनलाईन कार्यक्रम उत्साहात

भडगाव प्रतिनिधी । रंजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘कोरोना कडून कॉलेज कडे’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयीन जीवन हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी उपयोगी ठरते. मागील दोन वर्षापासून कॉलेज शी संपर्क न आल्यामुळे तरुणांमध्ये बेपर्वा वृत्ती, आळस, स्थुलता, या शारीरिक व्याधी वाढल्या आहेत तर ऑनलाईन परीक्षा पध्यतीमुळे काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवण्याचा सराव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज मधील प्रत्यक्ष जीवनात नियोजन, संयोजन, विचारांचे अदान प्रदान, वादविवाद, विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन, एन.एस.एस शिबीर यातून आपला विकास साधावा अशी अपेक्षा सिनेट सदस्य अमोल पाटील यांनी व्यक्त केली. ते रजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित करोना कडून कॉलेज कडे या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड हे होते.

दिनांक २० ऑक्टोंबर पासून महाविद्यालये ऑफलाईन पध्यतीने सुरू होत आहेत, या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, शासकीय नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात यावे. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सोय महाविद्यालयात करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमितपणे यावे असे आव्हान प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दीपक मराठे आभार प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास प्रचंड संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली, यावरून त्यांची महाविद्यालयात येण्याची तीव्र इच्छा दिसून आली.

 

Protected Content