आदिवासी आश्रम शाळेत बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गंत मार्गदर्शनपर चर्चा

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लालमाती ता.रावेर येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत ग्रामविकासमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान अंतर्गत सदिच्छा भेट दिली.

यावेळी बालिका मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षमीकरण या विषयावर डॉ केतकीताई पाटील (महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष तथा जळगाव पश्चिम ,पूर्व आणि महानगर च्या महिला मोर्चाच्या समन्वयिका) यांनी विद्यार्थ्यांनी सोबत चर्चा करून मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांच्या बरोबर आदिवासी नृत्यात सहभागी झाले. याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक मनिष तडवी, अधिक्षक एम एस बावणे, प्रकाश चव्हाण, जयराम पवार, अनिल पवार, मुनिर तडवी, इरफान तडवी, विशाल पवार यांच्या सह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content