धरणगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बाभूळगाव शिवारातील तुकाराम धनगर पाटील यांच्या शेतात रात्री तीन वाजेच्या सुमारास गाईवर बिबट्याने हल्ला करत गाईचा फडशा पाडला आहे.
बाभूळगाव शिवारातील तुकाराम पाटील यांच्या शेतात मंगळवार, दि.15 मार्च रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास शेतात बाधलेल्या गाईवर बिबपट्याने केलेल्या हल्ल्यात गाईचा जागीज मृत्यू झाल्याने बाभूळगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी शिवाजी माळी आणि क्षीरसागर यांनी पंचनामा करून शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळूवन देऊ व त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करू असे आश्वासन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला दिले.
अचानक झालेल्या बिबट्याचा हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी बाभूळगाव ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना केली. पुन्हा या परिसरात बिबट्या आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.