शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांना शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना एक महिना कैद व दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने आज मंगळवार १४ डिसेंबर रोजी दुपारी सुनावणी आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव येथील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक अमितराज जाधव हे १३ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे सहकारी उपसंचालक सुरेंद्र देवाजी वाढई, मनोजकुमार निंबाजी खैरनार आणि चालक वसंत सपकाळे असे सर्वजण वाढई यांच्या कॅबिनमधून शासकीय कामासाठी बाहेर जाण्यास निघाले होते. त्यावेळेस खटल्यातील आरोपी प्रमोद रामदास इंगळे व रवींद्र दामू सोनवणे हे वाढई यांच्या कॅबिनच्या बाहेर दरवाजाजवळ आले. व विचारले की, आमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली हे सांगा याचा आग्रह दोघांनी धरला व शासकीय कर्मचाऱ्यांचा जाण्याचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे चौघांना कॅबिनमध्ये परत जाण्यास भाग पाडले. दरम्यान प्रमोद इंगळे आणि रविंद्र सोनवणे यांनी सहाय्यक संचालक अमितराज जाधव यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अतिमराज जाधव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्ह्याचा खटला जळगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एन माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुरावे अंती न्यायालयाने आरोपी प्रमोद रामदास इंगळे आणि रवींद्र दामू सोनवणे यांना दोषी मानत दोघांना एक महिन्याची शिक्षा व ५०० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ३ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी कामकाज पाहिले.

Protected Content