केळी महामंडळ स्थापन करा – रावेर बाजार समितीची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | रावेर तालुक्यामध्ये केळीचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जाते. शेतक-यांच्या केळी या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळावा व केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य शासनाने केळी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालय महामंडळ स्थापने बाबत गिटींग घेण्यांत आली. त्यामध्ये बाजार समितीचे बाजार भाव समितीचे प्रमुख तसेच केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी ,कृषि विभाग व इतर कार्यालयातील मान्यवर उपस्थित होते. त्या मिटींगला केळी महामंडळ स्थापने बाबत चर्चा करण्यांत आली. केळी महामंडळ स्थापन झाल्यास केळीला चांगला भाव देता येईल व कमीजास्त भावाची तफावत राहणार नाही. सध्या बाजार समितीमध्ये केळी बाजार भाव समिती व सल्लागार समिती यांच्या मार्फत केळी बाजार भाव काढले जातात. केळी महामंडळ स्थापल्यानंतर केळी या शेतीमालावर प्रक्रीया करणारे उद्योग सुरू करता येतील. ब-याच वेळेस शेतक-यांच्या केळी मालाला बाजार भाव कमी मिळतो.अशा वेळी बाजार समितीला जाबाबदार धरले जाते. केळी हा नाशवंत माल असल्यामुळे त्याला जास्त वेळ ठेवता येत नाही. म्हणुन केळी महामंडळ लवकरात लवकर स्थापने खुप जरूरीचे आहे. तरी जळगांव जिल्हा मध्ये लवकरात लवकर केळी महामंडळ स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी .तसेच केळी महा मंडळ स्थापने मध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती रावेरचा समावेश करावा अशी मागणी कृषी रावेर उत्पन्न बाजार समिती सभापती गोपाल नेमाडे, उपसभापती गोटू महाजन, संचालक डॉ. राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, श्रीकांत महाजन, कैलास सरोदे, नीलकंठ चौधरी, योगेश पाटील, शेतकरी प्रतिनिधी जिजाबराव पाटील, सचिव गोपाल महाजन यांनी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/629919591490950

 

Protected Content