Home राजकीय करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या इमारती सील – मुंबई महापालिकेची कारवाई

करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या इमारती सील – मुंबई महापालिकेची कारवाई

0
43


मुंबई वृत्तसंस्था | अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते राहत असलेल्या इमारती परिसरातील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी पार्टी आयोजित एकण्यात आलेली होती. या काल रात्री झालेल्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. या पार्टीमध्ये सहभागी असलेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने इमारत पूर्णपणे सील केली आहे. तसे फलकही इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. होम कॉरंटाईन असल्याने परिसर सॅनिटाईझ करण्यात येत असून परिसरात कोणी येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.

यासह करण जोहर यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महिप खान यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पार्टीत सहभागी मलायका अरोरा आणि अभिनेत्री आलिया भट यांचे कोविड चाचणीचे अहवाल अद्याप आले नसून पार्टीत सहभागी असणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.


Protected Content

Play sound