पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एलसीबीचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यास येत्या ३ दिवसात सेवेतुन बडतर्फ करून तुरुंगात पाठविण्यात यावे अशी मागणी शिवसेना (शिंदे गट)तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
किरणकुमार बकाले याने सखल मराठा समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. हे निवेदन शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख किशोर बारावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी मा. नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, मा. नगरसेवक वाल्मिक पाटील, जितेंद्र पेंढारकर, सागर पाटील, राहुल पाटील, वैभव राजपुत, जितु पाटील, अरुण ओझा सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बकाले यांना निलंबित करून १५ दिवस उलटले तरी त्यांची पोलीस दलातुन बडतर्फीची व अटकेची कारवाई झालेली नाही. न्यायपालिकेने जामीन फेटाळल्यानंतर ते मोकाट फिरत आहे. तसेच त्यांना पोलीस दलातुन बडतर्फीची ठोस कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याच्यामागे कुणाचा तरी श्रेय तर नाही ना ? किरणकुमार बकालेला पाठीशी घालणाऱ्या व मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या ३ दिवसात ठोस कारवाई नाही झाली तर शिवसेना (शिंदे गट) गटाकडुन शहरप्रमुख किशोर बारवकर हे दि. १३ आॅक्टोबरपासुन आमरण उपोषणाला बसणार आहेत. निवेदन निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले.