मुक्ताईनगरात दोन समुदायांमध्ये तणाव

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील बर्‍हाणपूर रोडवर असणार्‍या एका हॉटेलमधील वादातून दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्मित झाल्याची घटना रात्री घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बर्‍हाणपूर रोडवर असणार्‍या एका हॉटेलमध्ये झालेल्या वादामुळे दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्मित झालेले आहे. दोन्ही समुदायांमधील जमाव रस्त्यावर जमल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जनतेने कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Protected Content