पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी – दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पहूर पेठ गृप ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते संतोष चिंचोले होते .
प्रारंभी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , अॅड .एस .आर . पाटील , पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे ,मनोज जोशी, गणेश पांढरे, शांताराम लाठे , उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील ,आरोग्यदूत अरविंद देशमुख आदींनी मनोगतातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात यशस्वीरित्या रुग्णांवर उपचार करत असलेल्या येथील भूमिपुत्र वैद्यकीय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे , कोवीड सेंटरमध्ये मनोरंजनात्मक उपक्रमातून कोरोनाग्रस्तांना मानसिक बळ देणारे आरोग्यदूत अरविंद देशमुख तसेच शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शंकर भामेरे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाब पुष्प आणि शाल -श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी उपसरपंच इका पैलवान ,अशोक पाटील, शेख सलीम शेख गणी , संदीप बेढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले तर आभार भारत पाटील यांनी मानले .यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले .