जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी महापालिकेच्या आवारात महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कूलभूषण पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक विचाराचे कृतिशील संत होते तसेच भारत हा गाव खेड यांनी बनलेला देश असल्याने गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल अशी त्यांची श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी स्वतःला ग्रामविकासाच्या कार्याला वाहून घेतलं खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला व ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्राम उन्नतीचा मार्ग सांगितला असल्याची माहिती महापौर महाजन यांनी सांगितले. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.