मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे सर्रासपणे सुरूच; भाजयुमोचे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात बेकायदेशीर दारूच्या विक्रीसह अवैध धंदे सर्रासपणे जोरात सुरू असून याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात अवैध धंद्यांना ऊत आलेला होता. संपूर्ण देश थांबलेला असतांना सुद्धा मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरित्या दारू विक्री, पत्याचे क्लब, सट्ट्याच्या पिढ्या व अवैध वाळू तस्करी सर्रास सुरु होती व अजूनही पोलीस व कायद्याला न जुमानता सुरु आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुक्ताईनगरच्या वतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके, रोहिणीताई खडसे खेवलकर व अशोक कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार, मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.

सदर अवैध धंदे तत्काळ बंद होणेसाठी आपल्या स्तरावरून तत्काळ योग्यती कार्यवाही करण्यात यावी, नाहीतर भारतीय जनता युवा मोर्चा मुक्ताईनगरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी प्रशासन जवाबदार राहील. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ताभाऊ पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, सरचिटणीस मुन्ना बोंडे, बाळा सोनवणे, जितेंद्र पाटील, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष अर्जुन सांगोलकर, भुषण पाटील, कल्पेश पाटील, राहुल बाभुळकर, हर्षद महाजन,जयेश कारले, मयूर साठे,संदीप घुले, प्रशांत गवळी, अशोक सोनवणे, दामू सोनवणे, भास्कर सोनवणे, काशीनाथ मोहिते, विकी चव्हाण, रामसिंग चव्हाण, आकाश चव्हाण, मान कंठ जाधव, संजय इंगळे, भिका गोपाळ, आकाश सोनवणे , अरुण गायकवाड, अरुण छगन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर मारुती सोनवणे, सोपान कांडेलकर, संदीप महाजन, हर्षल पाटील, प्रशांत सोनवणे, अशोक सोनवणे, दामू सोनवणे, भास्कर सोनवणे, मायकल इंगळे, भिका गोपाळ, आकाश सोनवणे, अरुण गायकवाड, संदीप महाजन आदी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content