चेन्नई, वृत्तसंस्था ।तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती नुकतीच समोर येतेय. या स्फोटात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजते र चारपेक्षा अधिक लोक गंभीररित्या भाजले आहेत. तामिळनाडू पोलिसांनी ही माहिती दिली.
कुड्डालोर जिल्ह्यातील कट्टूमन्नारकोली भागात स्थित फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. हा कारखाना चेन्नईपासून १९० किलोमीटर दूर असल्याचं समजतंय. फटाक्यांच्या फॅक्टरीत आग कशामुळे लागली? याची चाचपणी करण्यासाठी तज्ज्ञही घटनास्थळी दाखल झाले