यावल येथे पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

यावल प्रतिनिधी | यावल येथील अधिकारी शहरात गस्त घालत असतांना त्यांना महाजन गल्लीतून जातांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर त्याना आढळून आला.

याविषयी सविस्तर बातमी अशी की, मंडळ अधिकारी शेखर अलाबक्ष तडवी याना दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी फैजपूर उपविभागीय अधिकारी यांचा 05.30 फोन आला. त्यानी, “यावल शहरात अवैध वाळूची वाहतुक होत असल्याची मला माहीती मिळाली आहे. तरी तुम्ही स्टॉफसह यावल शहरात गस्त घालून वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडून कारवाई करा..” असे सांगितले.

त्यानुसार मंडळ अधिकारी शेखर अलाबक्ष तडवी यांनी पि.ए कडनोर,( मंडळ अधिकारी साकळी) , मुकेश तायडे, (तलाठी कोरपावली), संदिप गोसावी (तलाठी कोळवद) ,समीर तडवी (तलाठी परसाळे), पि.एन नेहते (तलाठी चुंचाळे), बाभुळकर (तलाठी टाकरखेडा), यांना फोन करुन गस्त घालण्याविषयी सांगितले. मंडळ अधिकारी शेखर अलाबक्ष तडवी व साकळी येथील मंडळ अधिकारी शहरात गस्त घालत असतांना मोठा वाडा, महाजन गल्ली येथे सकाळी 7.35 वा वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर त्यांना दिसले.

ट्रॅक्टरवर असलेल्या ड्रायव्हरला वाळू, वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने काहीही उत्तर दिले नाही. त्यावरुन त्यांची खात्री झाली की, सदरची वाळू ही भरत गोपाळ कोळी व ड्रायव्हर सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शासनाच्या कुठल्यातरी गौण खनिज साठ्यातून चोरुन आणली आहे. वाळू हायड्रोलीक करुन खाली करत पळून जाणाऱ्या ड्रायव्हला अडविण्याचा प्रयत्न केला असता भरत गोपाळ कोळी याने ड्रायव्हरला “तु ट्रॅक्टर थांबवू नको” असे म्हणत दोघी मंडळ अधिकारी यांच्या मोटरसायकल खाली रस्त्यावर फेकल्या आणि आपली मोटरसायकल घेऊन गेला. दरम्यान त्या ट्रॅक्टरचे मंडळ अधिकारी यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेतले व दोन पंचाना बोलावून ट्रॅक्टरमधील खाली टाकलेल्या वाळूचा पंचनामा केला. त्यानुसार तीन हजार रुपये किमतीची सुमारे एक ब्रास वाळू आढळून आली.

Protected Content