आम्ही आमच्या बांधवांचे बलिदान विसरणार नाही : एसटी कर्मचार्‍यांची व्यक्त केली भावना(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी|परिवहन मंत्र्यांनी कामावर हजर होण्याचे निर्देश दिले असले तरी येथील एसटी कर्मचार्‍यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला आहे. आपण विलीनीकरणासाठी शहीद झालेल्या कर्मचार्‍यांचे सूतक पाळत असून हे सूतक विलीनीकरणाच्या माध्यमातून फिटल्यानंतरच आम्ही कामावर येऊ असा पवित्रा जळगावातील एसटी कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

 

“महाराष्ट्रातून जे ४२ कर्मचारी बांधव या संपात आपल्या न्याय मागण्यासाठी लढत असतांना ज्यांनी बलिदान दिलं आहे पगारवाढीच्या दिलेल्या चॉकलेटवर भुलून आम्ही आमच्या बांधवांचे बलिदान विसरणार नाही. जनतेची सेवा करण्यासठी आम्ही तत्पर आहोत परंतू आमच्या कष्टाचं आणि आमच्या घामाचं जे दाम आहे ते आम्हाला देण्यात यावं. दाम आम्हाला भीक म्हणून नकोय आम्हाला आमचा हक्क पाहिजे आहे. अल्तीमेटम दिलेला आहे पण आमच्या भावनेचा विचार करावा. आमच्यामधून कोणीही फुटलेलं नाही. आम्ही एकजुटीने सोबत आहोत.” अशा शब्दात यशोदा पांढरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विजय पाटील यांनी आझाद मैदानावरील आपला अनुभव व्यक्त केला ते म्हणाले, “आझाद मैदानातील लढा अजुनच मजबूत झालेला आहे. त्या ठिकाणी अगोदर भाजपाचे दोन आमदार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरु होता मात्र त्यांनी आपले नेतृत्व काढल्यामुळे कर्मचारी आपल्या नेतृत्वावर विलीनीकरणाच्या मागणीसाठी स्वत: आग्रही राहत आपला हक्क मागत आहेत असं सांगत सदावर्ते आपला दिवसातून एक दोनदा भेट देऊन न्यायालयात घडणाऱ्या प्रक्रीयेविषयी अपडेट देत आहेत. अजून कर्मचारी सोबत जुळत आहेत… ” अशी माहिती त्यानी यावेळी दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3094909884122251

 

Protected Content