यावल बस आगारात बांधकामासाठी अवैध वाळू उपसा; तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून यावल बस आगारात सुरु असलेल्या शासकीय बांधकामासाठी तापी नदीतील वाळूचा वापर होत असून, ती वाळू ठेकेदाराकडून अवैधरीत्या विना परवाना साठवली जात आहे. या प्रकरणाकडे यावल महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकीकडे साध्या रिक्षामधून वाळू वाहतूक पकडल्यास महसूल प्रशासन लाखोंचा दंड आकारते, तर दुसरीकडे मोठ्या ठेकेदारांना शासनाचा महसूल बुडवून पाठबळ दिले जात असल्याचे दिसत आहे. महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी योजना राबवत असताना, महसूल प्रशासनाकडून मोठ्या ठेकेदारांसाठी वेगळे कायदे आणि सर्वसामान्यांसाठी वेगळे कायदे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राकेश सोनार यांनी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना आपल्या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे उपस्थित होते.

 

Protected Content