Home क्राईम जांभूळ येथे गावठी दारू अड्डयावर धाड

जांभूळ येथे गावठी दारू अड्डयावर धाड

0
42
FIR

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या जांभूळ येथे पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर धाडी टाकून ७६००रुपये किमतीची गावठी दारू व कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला. असून तीन आरोपींंना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूर पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ भरत लिंगायत, पो.काँ.जितु परदेशी, अनिल देवरे यांच्या पथकाने गुप्त माहितीनुसार जांभूळ येथे गावठी दारू विकणार्‍यांवर धडक कारवाई केली.यात बशीर लालखा तडवी(वय४५)हा जांभूळ येथे त्याच्या घराच्या आडोशाला गावठी दारू विकत असतानाच पोलिसांनी अटक करण्यात आली. त्याच्या जवळ१६००रुपये किमतीची१५लिटर गावठी दारू मिळून आली. तसेच अब्दुल अबदर तडवी(वय४५)व बाबु चाँदखाँ तडवी(वय४०)हे जांभूळ येथील गावाजवळील नाल्याच्या जवळ गावठी दारू विक्री करतांना मिळून आले. त्यांच्या जवळून ६०००हजार रुपये किमती ची गावठीदारू व कच्चे रसायन मिळून आले. वरील सर्व आरोपींविरुद्ध पहूर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound