रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी आदिवासी पट्यात पुन्हा धडक कारवाई करत एक लाख रुपयाचा डींक व वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे.
याबाबत वृत्त असे की जिन्सी गावा जवळ वन खात्याच्या पथकाने टाटा सुमो क्रमांक एम एच २१ बी ०८५१ चौकशी कामे थांबविले असता त्यात गौण वनउपज (सलई डिंक) वनविभागाला मिळून आला. सदर वाहन चालकाला कडे वाहतूक परवाना विचारले असता त्याच्या कडे परवाना क्रमांक ०८५१ दि.०४ दाखविला. यात सलई डिंक१०:१५ किलो व धावडा डिंक १५ किलो नमूदकेला होता.परंतु प्रत्यक्षात वजन काट्यावर सदर डिंकाचे मोजमाप केले असता सलई डिंक ९ क्विंटल ९९ किलो १७० ग्राम भरला तसेच धावडा डिंक गाडीत आढळून आला नाही.वाहतूक परवाना व्यतिरिक्त उर्वरित डींक विनापरवाना वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहन अंदाजे किंमत एक लक्ष रूपये मूल्याचा सलई डिंक ९ क्विंटल ९९ किलो१७० ग्रॅम किंमत १,०९,९०८ /-रु. एकूण मुद्दे माल २,०९,९०८ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(ब)४२ व महाराष्ट्र नियमावली चे नियम ३१ ८२ अन्वय प्रथम रिपोर्ट नोंदवून जप्त केला. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे वनपाल राजेंद्र सरदार ,अरुणा ढेपले. वनरक्षक रमेश भुतेकर अधिसंख्य वनमजूर उत्तम पवार, राज तडवी, रुस्तम तडवी, बालू राठोड. वनवाहन चालक -विनोद पाटील यांनी संयुक्त रित्या कार्यवाही केली. पुढील तपास वनपाल अहिवाडी करीत आहेत.