गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात इफ्तार पार्टी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय व डॉ वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स महाविद्यालयातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इमाम मुफ्ती अबूझर नदीम साहब काझमी व इकरा महाविद्यालयाचे सोहेल अमीर उपस्थित होते.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सांगितले की रमजान महिना म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याची संधी आहे. जेव्हा आपण इतरांचे सुख-दु:ख समजून आनंदी जगासाठी प्रार्थना करतो. इमाम मुफ्ती अबूझर नदीम साहब कादरी यांनी सांगितले की रमजान हा पवित्र महिना असून याच महिन्यात पवित्र कुराण अवतरित झाले. जे आपल्याला जीवनाशी संबंधित तत्त्वज्ञान, नैतिकता, तसेच आदर्श वर्तन शिकवते. जेव्हा सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनी उपवास ठेवतात आणि यातूनच आपल्याला आत्मसंयम शिकायला मिळतो. इकरा महाविद्यालयाचे सोहेल अमीर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर इफ्तार पार्टीला महाविद्यालयामधील सुमारे 35 विद्यार्थी उपस्थित होते. सायंकाळी 6.43 ला रोजा सोडण्यात आला व नंतर नमाज अदा केली. इफ्तार पार्टीचे संपूर्ण नियोजन व तयारी महाविद्यालयाचे प्रा. आफ्रिन खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, डॉ. चेतन सरोदे यांनी पाहिले. यावेळी डॉ वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content