पारोळा शहरातील समस्या न सुटल्यास आमरण उपोषण; भाजपचे निवेदनाद्वारे इशारा !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील अनेक समस्या सोडवण्यासंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील समस्या न सुटल्यास भाजपतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम केल्या अडीच वर्षांपासून पारोळा नगरपरिषद करत आहे. हे सर्व पारोळा नगरपालिका व प्रशासक करीत आहे. शहरात अनेक समस्या निर्माण झाले आहे, यात १५ दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा हा ७ दिवसात केला पाहिजे, शहरातील गटारी तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, शहरातील नगरपालिकाच्या मालकीचे हॅन्ड पंप बंद आहे ते सुरू करावे, प्रत्येक परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, शिवाय शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील भागात रस्त्यावरील पथदिवे बंद स्थितीत असून ते सुरू करण्यात यावे, अमळनेर रोडवर असलेल्या महावितरणपर्यंतच्या रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे सुरू करावे आणि पारोळा शहरात आणि नवीन वसाहतीमध्ये धुराची फवारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पारोळा नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील अनेक समस्यांना सुटल्यास आगामी काळात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह शहराध्यक्ष मुकुंद चौधरी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Protected Content