शेतातील झोपडीला आग; तीन लाखाचे नुकसान

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील ३ लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाल्याची ही घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

पारोळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गुलाबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.पारोळा यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे.

Protected Content