नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर आता सहकार विभागा ॲक्शन मोडवर आले आहे. सलग ३ दिवस बाजार समिती बंद राहिल्यास आता परवाने रद्द करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला आहे. याबाबत सहकार विभागाने बाजार समित्यांना पत्र लिहिले आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. त्यांनतर राज्यातील ठिकठिकाणी इतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती, त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.
गाळाधारक व्यापाऱ्यांनी ३ दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ववत करण्याचे सहकार विभागाचे आवाहन आहे. बाजार समित्यांमधील साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळला जाणार आहे. सहकार विभागाने सर्व जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतला आहे. जिल्ह्यात जवळपास 60 ते 70 टक्के व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळला. मात्र यावेळी नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार काय मध्यममार्ग काढणार याकडं लक्ष लागले आहे.
निर्यातबंदीनं शेतकरी हवालदील
मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती उत्पादनाचे मोठे नुकसान होवून शेतकरी चांगलाच झोडपलेला असतांना त्यातून शेतकरी कसाबसा उभा राहू पाहत होता मात्र पुन्हा एकदा केंद्र सरकारने ‘ निर्यातबंदी ‘ ची कुऱ्हाड शेतकऱ्यावर चालवल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून उल्लेख असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव ही देखील नाशिक जिल्ह्यातच आहे.जवळपास 80 टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीची तडाखा बसला.