इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार; काँग्रेसने दिले वचन

नवी दिल्ली -लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आल्यास मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्ज दिला जाईल, असे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून मराठी भाषेबाबत ही माहिती दिली.

११ जुलै १०१४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही निर्णय घेतला नाही. इंडीया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे.

Protected Content