साकळी गावात पिंजारी कुटुंबात आदर्श विवाह

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील पिंजारी कुटुंबात साखरपुड्यातच विवाह झाला असून याचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

विवाह म्हटले की, बडेजाव आलाच. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा चुराडा होत असतो. तथापि, मोठेपणा दाखवण्यात सर्वच कुटुंबे यासाठी मोठा खर्च करत असतात. या पार्श्‍वभूमिवर, तालुक्यातील साकळी गावातील पिंजारी कुटुंबात रूढी-परंपरा झुगारून एक आर्दश विवाह घडला आहे.

यावल तालुक्यातील साकळी गावात राहणारे अन्वर गुलाम पिंजारी यांची रोजमीन बानो कन्येच्या साखरपुडयास जळगाव येथील तांबापुर परिसरात राहणारे जाहिद ईस्माईल पिंजारी यांचा मुलगा फैजल पिंजारी हे आप्तांसह २० रोजी आले होते. याप्रसंगी दोन्ही बाजूंची मंडळी उपस्थित होती.

याप्रसंगी नियोजीत वधु आणी वरच्या मंडळीतील जेष्ठ समाज बांधव आणी साकळीचे सामाजीक कार्यकर्ते यांच्या गप्पा गोष्टी व चर्चेतुन जुन्या परंपरेला फाटा देवुन साखरपुडयातच लग्न का लावु नये ? असा प्रस्ताव वर पक्षाकडुन आला. मग काम नेक काम मे देरी क्यूं ? असे म्हणत पिंजारी कुटुंबातील दोघ कडील मंडळींनी सर्व लग्न लावुन घेतले. अशा प्रकारे साखरपुडयातच विवाह सोहळा अगदी साद्या पध्दतीने पार पडल्यामुळे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलुन गेले. साखरपुडयाचा कार्यक्रम विवाह सोहळ्यात परिवर्तीत करण्यासाठी साकळी गावातील समाजसेवक व उद्योगपती युनुस मंसुरी , रहीम राजु पिंजारी ( सर ) , कदीर पिंजारी भुसावल व आदी समाज बांधवांनी विशेष सहकार्य केले.

Protected Content