शेतबांधाजवळ वापराची वहिवाट बंद केल्याप्रकरणी शेतकऱ्याविरोधात तक्रार

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगावच्या शिवारातील एका शेतकऱ्याने इतर शेतकरी बांधवांची वापराची वहीवाट बंद केल्याने अनेकांनी यावल तहसीलदाराकडे लेखी तक्रार केली आहे.

शेतावरील बांधावरील मार्ग मोकळा करावा या संदर्भात तहसीलदारांनी तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करावे अशा सुचनासंबंधीतांना दिल्या आहेत. यावल तालुक्यातील दहीगाव शिवारात शेती असलेले वसंत रामदास महाजन यांची गट क्रमांक २६२चे क्षेत्रातील शेतजमीन असुन या शेतजमीनीच्या क्षेत्रातुन गट क्रमांक -२६१, २६७, ६९, २७१/१, २७०/२, २७१/२, २७०/४ आदी शेतकऱ्यांची शेताकडे जाण्याची वहीवाट असुन, वरील तक्रार अर्जात नमुद केलेल्या अनुसार वसंत रामदास महाजन यांनी रस्त्याच्या मार्गावर गट क्रमांक २६२चे पश्चिमेकडील बांधावर असलेला ट्रॅक्टर, बैलगाडी वहीवाटीचा पुर्ववापर असुन लाकुड व काटेफाटे आणी गवत टाकुन ठेवल्याने मागील तीन महीन्यापासुन रस्ता बंद केल्याने वरील पलीकडे शेतकरणाऱ्या शेतकऱ्यांना वहीवाट बंद झाल्याने शेतीच्या कामांना अडचणी निर्माण होवुन विलंब होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून हा मार्ग शेतकऱ्यांच्या वापरण्यासाठी मोकळा करण्यात यावा. या संदर्भात दहिगाव येथील शेतकरी ललीत मुरलीधर नेहते, सुकलाल मंगा महाजन, अनिल राजाराम बडगुजर, योगेश हिरामण महाजन, प्रमोद विलास सुर्यवंशी, नितिन ताराचंद जैन, भानुदास देविदास महाजन, राजेन्द्र शिवलाल जैन, प्रकाश राजधर माळी, हेमराज प्रभाकर पाटील, सुभाष बाबुलाल जैन आदी दहिगाव गावातील शेतकऱ्यांनी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. याप्रसंगी तहसील निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार उपस्थित होते.

Protected Content