मुंबई प्रतिनिधी । अजित पवारांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांनी आपले मौन सोडत ट्विटरवरून आपण पक्ष आणि पवार साहेब यांच्यासोबत आपल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. काल सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीसाठी आमदारांना त्यांच्याच निवासस्थानी बोलावण्यात आले होते. यामुळे ते अजितदादांसोबतच जातील असे मानले जात होते. यातच काही तास त्यांचा फोन बंद असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची धाकधुक वाढली होती. मात्र ते शनिवारी सायंकाळी पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले. यानंतर शरद पवार आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या पार्श्वभूमिवर, आता त्यांनी एक ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी आपण पक्षासोबत आपण पवार साहेबांसोबत असून कुणीही संभ्रम पसरवू नये असे म्हटले आहे. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याने राष्ट्रवादीतील अस्वस्थता कमी होणार आहे.
खाली पहा : धनंजय मुंडे यांनी केलेले ट्विट.
मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.@PawarSpeaks @NCPspeaks
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 24, 2019