पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज पुरंदरच्या दौर्यावर असतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या वयावरून चिंता व्यक्त करणार्याला मिश्कील शैलीत उत्तर दिले.
आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुरंदरच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकर्यांने शरद पवारांना या वयात बाहेर फिरू नका, अशी विनंती केली. त्यावर शरद पवार म्हणाले की, कोण म्हणतं मी म्हातारा झालोय. काय पाहिलं तुम्ही? असा प्रश्नही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाही तर पवारही आपल्याच या बोलण्यावर मनमुराद हसले.
दरम्यान, याप्रसंगी त्यांनी सत्ताधार्यांवर कडाडून टीका देखील केली. ते म्हणाले की, संकटग्रस्त शेतकर्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेळ पडल्यास संघर्ष करू असा इशारा देखील त्यांनी दिला.