मी आजतरी भाजपमध्येच आहे : एकनाथराव खडसे

khadse e1550572684596

 

मुंबई (वृत्तसंस्था) मी आजतरी भाजपमध्येच आहे, असे संभ्रमात टाकणारे वक्तव्य सोमवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

 

एकनाथराव खडसे यांनी काल (सोमवारी) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर ते आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी बोलतांना एकनाथराव खडसे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. मी आजतरी भाजपमध्येच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मतदारसंघातील काही प्रकल्पांची चर्चा करण्यासाठी मी पवारांना भेटलो होतो. आज मी उद्धव ठाकरे यांनाही भेटेन. परंतु, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी आज भारतीय जनता पार्टीत आहे, असे खडसे यांनी सांगितले.

Protected Content