आमदारांचे आव्हान मी स्विकारतो, ते जर खरच गद्दार नसतील – अमोल शिंदे..

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला शेतकरी विरोधी निर्णय मागे घेण्याकरीता राज्याचे मंत्री आमचे नेते मा. ना गिरीषभाऊ महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्या अनुषंगाने मा. आमदार हे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असुन ते संबंधित जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. त्यामुळे आम्ही सदर विषयांत त्यांना लक्ष केले. परंतु त्यांनी मुळ विषय भरकटत नेऊन माझ्यावर वैयक्तीक खोटे आरोप करत मुद्दामुन मुळ विषय टाळुन दिला. आमदार किशोर पाटील हे सध्या वैफल्यग्रस्त झाले असुन माझ्यावर पातळी सोडुन वैयक्तिक टिका करीत आहे.

मी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलतांना राज्यातील युती सरकार व युतीतील कुठल्याही नेत्यांवर आरोप केलेले नाहीत.मा. आमदार महोदयांनी तालुक्याचा लोकप्रतिनीधी या नात्याने शेतकऱ्यांसाठी ज्यागोष्टी करावयास हव्या होत्या त्याबाबतीत ते आजही अ-कार्यक्षम ठरले आहेत. हा किंवा तो तालुका दुष्काळग्रस्त झाला नाही असे हेवेदावे न करता मा. मुख्यमंत्र्यांच्या नुसते जवळचे नाही तर स्वत:च मुख्यमंत्री असल्याचे तुम्ही म्हणतात मग आपला पाचोरा-भडगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात तुम्ही का अपयशी ठरले ? पिक विम्याकरीता २१ दिवस पावसाचा खंड पडल्यानंतर इतर तालुक्यांचा त्यात समावेश होतो मग पाचोरा-भडगांवचा का होत नाही? तोही हेवा तुम्ही करायला हवा. मतदारसंघात नादुरुस्त हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पिकविम्यापासुन वंचित रहावे लागते आम्ही वेळोवेळी नविन स्वयंचलित हवामान यंत्र (ए. डब्ल्यु. एस.) मिळावी यासाठी निवेदणे दिली व आजही मागणी करीत आहोत.परंतु आपला अभ्यास त्यात शुन्य असल्यामुळे आपल्याला ए‌. डब्लयु एस., पोखरा याचा साधा अर्थ देखिल सांगता येणार नाही. ही आमच्या पाचोरा-भडगांव तालुक्यातील जनतेसाठी शोकांतीका आहे. पोकरा योजनेत मालेगांव व बीडच्या धर्तीवर पाचोरा-भडगांव तालुक्यातील सरसकट सर्व गावांचा समावेश व्हावा यासाठी आम्ही निवेदणे दिली व आजही मागणी करीत आहोत.

आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सर्वांत ज्वलंत विषय म्हणजे कापुस बियाणे व १० / २६ / २६ सारखी रासायणीक खते ज्यादा पैसे देऊन देखील शेतकऱ्यांना मिळत नाहीत. याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी आम्ही निवेदणे दिलीत व आजही प्रयत्नशील आहोत. परंतु लोकप्रतिनीधी या नात्याने तुम्ही चकार शब्दसुध्दा बोलत नाहीत. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी विधानसभेतील सर्वच सदस्यांचे भाषण ऐकतो कारण माझ्या पाचोरा-भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्यांप्रमाणे न्याय मिळावा यासाठी उदा. मागील काळात अधिवेशनात काही सदस्यांनी आवाज उठवुन भात पिक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत मिळवुन दिली. परंतु येथील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपण कुठला आवाज उठवला किंवा प्रश्न उपस्थित केला परंतु आमदार महोदय आपला तेवढा अभ्यास नाही आणि तुम्ही फक्त अधिवेशनाच्या नावाने मुंबई येथे जावुन स्वत:ची मौज व एैयाशी करतात. आणि जर आम्ही शेतकरी, गोरगरीब, तरुण, महिलांच्या समस्या सोडविण्याकरीता आवाज उठवला तर त्यांत गैर काय ? स्थानीक लोकप्रतिनिधी म्हणुन तुम्हाला चार प्रश्नही विचारु नये का ? आणि तुम्ही या प्रश्नाचे निराकरण जर करु शकत नसाल तर हे मतदार संघाच दुरभाग्य समजावे लागेल.

आमदार महोदय ज्या शाळेवर टिका करीत आहेत. याच शाळेला राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते विभागाचा तृतीय पुरस्कार “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. जिल्ह्यात आर्दश शाळा म्हणुन या शाळेचा लौकीक आहे. तालुक्यातील प्रत्येक पालकाला वाटते की, माझ्या मुलांनी अमोल शिंदे यांच्या शाळेतुन शिक्षण घ्यावे. तसेच या शाळेतुन आय.ए.एस, डॉक्टर, आय.आय.टी, इंजिनियर आणि आदर्श व्यक्ती घडविणारी हि शाळा नावारुपांस आहे. कदाचित आमदार महोदय विसरले असतील. की काही काळांआधी ते स्वत: जवळच्या व्यक्तींना प्रवेश मिळावा म्हणुन मला कॉल करत असायचे व त्यांच्या परिवारातील काही विद्यार्थ्यांनी देखील याच शाळेतुन शिक्षण घेतले आहे हे ते आता विसरले असावे.

मला देवेंद्र फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब व माझे नेते गिरीषभाऊ महाजन यांनी दुसऱ्यांदा सलग तालुकाध्यक्ष पद दिले. स्थानिकपदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळे मला सर्व नेत्यांनी पाचोरा – भडगांव विधान सभेचे निवडणुक प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. याउलट तुम्ही मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेबांवर शारीरीक व्यंगात्मक टिका केली आहे. बावनकुळे साहेबांना त्यांच्या आडनावावरुन अपशब्द वापरलेले आहे. आमचे नेते गिरीषभाऊ महाजन यांच्यावर टिका करतांना तुम्ही खालचा स्तर गाठुन भाषा केलेली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांना हिन दर्जाची वागणुक देणे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, पाचोरा – भडगांवची भाजपा म्हणजे चार डोके असलेली फक्त एक मारोती कार असा उल्लेख तुम्ही सतत करत आला आहात. त्यामुळे तुम्हाला भाजपा शब्द तोंडातुन उच्चारण्याचा देखील नैतीक अधिकार नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकित स्वत: आमदारांनी युती धर्म पाळला नाही. त्यांनी व त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले. स्वत:च्या अंतुर्ली गावात युतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना मोठ्या फरकाने मागे ठेवले व विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळवुन दिले. तुमच्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी देखील उघड – उघड विरोधी उमेदवार करण पवार यांचे काम केले आहे. याबाबतीत पुरावे देखील आहेत. पाचोरा- भडगांव तालुक्यातील स्मिताताईंना मिळालेले मताधिक्य हे फक्त आणि फक्त भाजपाच्या तळागाळातील कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे.

उन्मेष पाटील आणि करण पवार हे मातोश्री वर प्रवेशांसाठी गेले तेव्हा मी तेथे उपस्थित होतो असा आरोप त्यांनी केला. परंतु मी तेथे उपस्थित असल्याचा फोटो किंवा मी उन्मेष पाटील व करण पवार यांच्या संपर्कात असल्याचा सी. डी. आर. रिपोर्ट अथवा मी उपस्थित असल्याचा, मातोश्री वरील सी. सी. टी. व्ही. फुटेच, पुरावा, कुठलाही दाखला त्यांनी दिला, तर मी या ठिकाणी जाहिर करतो या उभ्या राजकीय आयुष्यातुन सन्यास घेण्यास तयार आहे. अन्यथा पुरावा न – दिल्यास तुम्ही राजकारणातुन सन्यास घ्यावा असे माझे तुम्हाला खुले आव्हान आहे, या करीता तुम्हाला एक आठवडयाची मुदत देतो. राहिलं माझ्या सर्व नेत्यांना माझ्यावर या आधीदेखील पुर्ण विश्वास होता आणि आजही आहे. त्यामुळे खोके, गद्दार हि आभुषणे तुम्हालाच लाभलेली आहेत.

होय, मी तुमचे चॅलेंज स्विकारलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत या अमोल शिंदे चे संघटन कौश्यल्य, योग्य नियोजन व वैयक्तिक केलेली आर्थिक मदत या जोरावर तुम्ही आमदार झालात. हे तुम्हालाही माहिती आहे आणि माय-बाप जनता ही जानुन आहे. याउलट २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सोबत युतीत लढलात आणि मी अपक्ष म्हणुन कुठल्याही नेत्यांची ढाल व पक्षाचा सपोर्ट न घेता लढलो. व जनतेच्या भरघोस आशिर्वादाने तुम्हाला तुमची जागा दाखवुन दिली. मी ही तुम्हाला चॅलेंज देतो. जर तुमच्यात खरचं हिम्मत असेल तर तुम्हीपण अपक्ष निवडणुक लढवावी आणि होऊन जाऊ देत दुध का दुध – पाणी का पाणी अथवा तुमच्या वरीष्ठ नेत्यांना सांगुन पाचोरा – भडगांव विधानसभा निवडणुक ही मैत्रीपुर्ण लढतीत लढावा – म्हणजेच तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर तर मी भाजपाच्या कमळावर मग निवडुण येवुन दाखवावे. तेव्हा तुम्हाला या पाचोरा – भडगांव तालुक्यातील जनता गद्दार नाही तर खरा खुद्दार समजेल. असे भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख तथा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील, परेश पाटील, शहराध्यक्ष दीपक माने, रमेश वाणी, अरुण पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, मुकेश पाटील, समाधान मुळे,जगदीश पाटील, योगेश ठाकूर, रोहन मिश्रा, अमोल नाथ आशिष जाधव,आबा कुमावत,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content