भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागून झोपडी व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वडजी येथील रहिवाशी मोहन भिल्ल हे आपल्या पत्नी सुनंदा भिल्ल यांच्यासह राहतात. आज सकाळी पती पत्नी मजूरीसाठी बाहेर कामाला गेले होते. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भिल्ल यांच्या झोपडीला अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहीत्य जळून खाक झाले. अन्नधान्यासह कपडे, टीव्ही, भांडे आदि वस्तु जळाल्याने या कुटुंबाचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. जळालेला संसार पाहून सुनंदा भिल्ल यांच्या डोळ्यात अश्रूनी घर केले होते.
आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी विलास शिंदे यांनी घटस्थळी येऊन पंचनामा करून अवहाल तहसिल कार्यालयात सादर केल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जिकरीने ही आग आटोक्यात आणली. यावेळी वडजी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पाटील, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील यांनी भेऊन मदत मिळवून देण्थासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सुधाकर पाटील यांनी तहसिल सागर ढवळे यांना यासंदर्भात माहीती देऊन तत्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगीतले. तर महसुल विभागाकडुन या कुटुंबाला कीराणा उपलब्ध करू देऊ असे सांगीतले.