यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशहितासाठी व केन्द्र शासनाच्या राबवण्यात आलेल्या विविध देशहित व समाजहिताच्या योजनांची माहिती देशातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचावावी याकरीता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार यावल तालुक्यातील प्रत्येक गावात राबविले जात आहे. या अभियानास सर्व पातळीवर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. या गाव चलो अभियांनातर्गत निमगाव टेंभी खुर्द येथील बूथ क्रमांक २८० मध्ये प्रवासी कार्यकर्ते त्या माध्यमातून भाजपाच्या बूथ प्रमुख खापरू पाटील यांनी निमगाव येथील बुथ क्रमांक २८० मध्ये नागरिकांसोबत व महिला वर्गाला शासकीय योजना बद्दलची सविस्तर माहिती दिली जात आहे. त्यांनी प्रभावी मतदार व्यावसायिक जेष्ठ नागरिक व बुथ प्रमुख गोपाळ पाटील बुथ समितीतील पन्ना प्रमुख बेटी बचाव बेटी पढाव समिती सदस्य वीरेंद्र पाटील, समिती सदस्य मीनाक्षी पाटील त्यामध्ये उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, गांधी निराधार योजना, बचत गट योजना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्र शासनाने मागिल दहा वर्षाच्या कालावधीत अनेक विकास कामे केली. गोरगरीब व पिढीत वंचित तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना राबवल्या मोदी सरकारचे धन्यवाद देऊन भावना व्यक्त केल्या.
यावेळी समाधान कोळी अरुण कोळी. गोकुळ कोळी, संतोष कोळी, महेंद्र पाटील, गुरुदास पाटील नारायण पाटील, महेंद्र पाटील, राजू वंजारी, कांतीलाल पाटील, शांताराम पाटील, वासुदेव पाटील, सुनील पाटील, गणेश कोळी, अभिमान कोळी, विनोद महाजन, दयाराम महाजन, भीमसिंग पाटील, मंगलाबाई पाटील उषाबाई घोडे, लताबाई चौधरी, रेखाबाई मोरे, मराबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमगाव टेंभी येथे भाजपच्या गाव चलो अभियान कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
9 months ago
No Comments