Home Cities अमळनेर अंबर्शी टेकडीवरील यात्रेला भाविकांची अलोट गर्दी !

अंबर्शी टेकडीवरील यात्रेला भाविकांची अलोट गर्दी !

0
113


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर, चोपडा रस्त्यालगत असलेल्या अंबर्शी टेकडीवर आज आषाढी द्वादशीनिमित्त भव्य यात्रा उत्साहात संपन्न झाली. या एक दिवसीय यात्रेत हजारो भाविकांनी अंबार्शी महाराज यांचे दर्शन घेऊन मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण तालुक्यातून लाखो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती.

या यात्रेचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे फुग्याचे ‘काकडे’ होय. या यात्रेत प्रत्येकजण आवर्जून हे ‘काकडे’ विकत घेतात आणि हवेत किर्रर्र आवाज करत त्याचा आनंद घेतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या ‘काकड्यां’सोबत खेळण्याचा आणि त्यांचा आवाज काढण्याचा आनंद घेताना दिसले. हे दृश्य यात्रेची शोभा वाढवणारे होते.

भाविकांनी अंबार्शी महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. धार्मिक वातावरणासोबतच यात्रेत विविध खेळणी, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची दुकाने थाटली होती. आबालवृद्धांनी खरेदीचा आणि मनोरंजनाचा मनसोक्त आनंद लुटला.

यात्रा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी चोख नियोजन केले होते. यात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त ठेवला होता.


Protected Content

Play sound