Home Cities अमळनेर अमळनेर पोलिसांकडून गुरुजनांचा सत्कार; शिक्षकांचा गौरव !

अमळनेर पोलिसांकडून गुरुजनांचा सत्कार; शिक्षकांचा गौरव !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अमळनेर पोलिसांनी ‘गुरूंचा सन्मान’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील इंदिराभुवन येथे झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा आणि शिक्षकांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या संकल्पनेतून, जळगाव पोलीस अधीक्षक आणि चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते होते.

यावेळी बोलताना विनायक कोते यांनी सांगितले की, “अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरु असतो. जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते, मात्र त्याला सकारात्मक घ्या. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो.”

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे. चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देणारा दुवा आहे. शिक्षक आहेत म्हणून जग टिकून आहे. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा ‘गुरूंचा सन्मान’ एक छोटासा प्रयत्न आहे.”

या कार्यक्रमात मागील काळात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या आणि दिव्यांग शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे, प्रमोदिनी पाटील, प्रा. शिला पाटील, अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रणजीत शिंदे, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, स्वाती पाटील, छगन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधिक स्वरूपात गोकुळ साळुंखे, इंदूबाई महाले, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, दिलीप सोनवणे, महेंद्र पाटील यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला, त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांचा जागेवर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील, एपीआय रवींद्र पिंगळे, एपीआय सुनील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, फिरोज बागवान, गणेश पाटील, अशोक साळुंखे, चंद्रकांत पाटील, विनोद भोई, मिलिंद सोनार, लक्ष्मीकांत शिंपी, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, शेखर साळुंखे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले तर सिद्धांत शिसोदे यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound