हावडा एक्सप्रेसच्या डब्याला आग : सुदैवाने हानी टळली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हावडा एक्सप्रेसच्या डब्याला आज सकाळी बेटावदजवळ आग लागल्याची घटना घडली असून यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी ९वाजेच्या सुमारास अहमदाबाद हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस ला बेटावद ता शिंदखेडा रेल्वे स्टेशनच्या पांझरा पुला जवळपास रेल्वेच्या वातानुकूलित डबा चांकामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्या निदर्शनास आले.

यानंतर, क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली व रेल्वेतील अग्निशमन बंब च्या साहाय्याने आग विझवली. यामुळे रेल्वे अधिकारी व गँगमेन सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. दरम्यान,पावणे दोन तास गाडीची संपूर्ण तपासणी करून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

Protected Content