सत्तेसाठी किती तडजोड करणार ? चंद्रकात पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनी लॉड्रिंग प्रकरणी इडीच्या अटकेत असलेल्या मंत्री मलिक यांचे बॉम्बस्फोट गुन्हेगारांशी संबंध उघड झाले आहेत. तरी मलिक यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. सत्तेसाठी किती तडजोड करणार? असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी इडीच्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री मलिक यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांशी प्रथम दर्शनी व्यावहारिक संबंध असल्याच्या दाव्यात तथ्य आहे, असे विशेष न्यायालयाने मान्य केले आहे. यावरून राज्यात आता राजकारण तापत असून विरोधी पक्षांकडून सत्ताधारी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री मलिकांचा मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांशी असलेला संबंध आणि मनी लॉड्रिंगप्रकरणी प्रकरणी अटक होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. मालिकांकडची खाती काढून घ्यायला मुख्यमंत्री तयार नव्हते, परंतु खाती ठेवली तर फायली सहीला तुरुंगात पाठवाव्या लागतील हे लक्षात आल्यामुळे नाईलाजाने खाती काढली. पण अजूनहि मंत्रीपदाचा राजीनामा घेतलेला नाही. तर दुसरीकडे एकाद्याने फेसबुकवर पोस्ट टाकली, तर तातडीने १५-१६ जिल्ह्यात केसेस दाखल होऊन अतिरेक्याप्रमाणे अटक केली जाते. जामीन मिळू शकणार नाही अशी व्यवस्था केली जाते. पण हा देशच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींशी संबंध असल्याचे न्यायालयाने केल्यानंतरही संबंधित राजीनामा घेतला जात नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना नसून पवारसेना असल्याची स्थिती आली आहे. टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी केली.

Protected Content